प्रशिक्षण कार्यक्रम|महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादीत, पुणे

                                                                                                                                                           HTML tutorial     English / मराठी

प्रशिक्षण कार्यक्रम

शेतक-यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याकरीता उत्पादित कृषि मालासाठी शाश्वत बाजार पेठ उपलब्ध करणे, कृषि मालाचे मुल्यवर्धन करणे, कृषि प्रक्रिया उदयोगात वृध्दी करणे गरजेचे आहे. या उद्देशाची पुर्तता करण्यासाठी सहकार विकास महामंडळामार्फत्‍ राज्यातील विविध कार्यकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे सभासद / वैयक्तीक शेतकरी यांच्यासाठी पाच दिवसीय निवासी “Agri Business Start-up” प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यांत येत आहे.

प्रशिक्षणाचा उद्देश :-

शेतक-यांच्या शेतमालाचे मुल्यवर्धन व उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे.

ग्रामीण भागात उदयमशीलता व कौशल्या विकासाच्या संधी निर्माण करणे..

सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांचे आर्थिक बळकटीकरण व रोजगार निर्मिती करणे.

सहकारी प्रक्रिया उदयोगांना कर्ज व गुंतवणुकीच्या स्वरूपात वित्त पुरवठयाबाबत मार्गदर्शन करणे.

कृषि मालाची निर्यात वृध्दी करण्याबाबत मार्गदर्शन करणे.

प्रशिक्षणार्थीचे निकष:-

प्रक्रिया उदयोग उभारण्यास इच्छूक सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / बचत गट / वैयक्तीक शेतकरी.

सहकार विकास महामंडळाकडे कर्ज प्रस्ताव / बीडीपी सादर केलेल्या संस्थांचे प्रतीनिधी

देशांतर्गत व परकिय बाजारापेठेत मालाची विक्री व्यवस्थापन करणारे इच्छूक व्यक्ती / संस्था / कंपनी प्रतीनिधी.

कृषि आणि पणन व्यवस्थेत कार्य करणा-या शासकीय / निमशासकीय / खाजगी संस्थांचे प्रतीनिधी.

प्रशिक्षणाची सविस्तर माहितीसाठी खालील अधिकारीऱ्यास संपर्क साधा:

अधिकारीचे नाव : डी. एम. साबळे

पदनाम: -ऍग्री बिजनेस एक्सपर्ट

संपर्क व्यक्ती -दीपमाला  खनके ,8080757616

प्रशिक्षण नोंदणी अर्ज

माहितीपत्रक-शेतकरी उत्पादक कंपनीसाठी वेबिनारद्वारे कार्यशाळा

माहितीपत्रक-बंदिस्त शेलीपालन वेबिनारद्वारे

माहितीपत्रक-मधुमक्षिका वेबिनारद्वारे कार्यशाळा

ऍग्री बिजनेस प्रशिक्षण अर्जाचा नमुना -- Download Form

""बांबु शेती-एक फायदेशीर व्यवसाय"प्रशिक्षण अर्जाचा नमुना - "- Download Form